News34 Gadchandur
गडचांदूर :- कोरपना तालुक्यात हल्ली सतत लहानमोठे अपघात घडत आहे.याच पार्श्वभूमीवर नांदाफाटा येथे मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास एक Vegetable seller महिला चारचाकी हात ठेला घेऊन नांदाफाटा चौकाकडे जात असतांना गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या एका बाईकस्वाराने या महिलेला मागून जोरदार धडक दिली accident.
आणि या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी सदर बाईकस्वारांने तेथून पळ काढला.ही घटना Cctv मध्ये कैद झाली असून बाईकस्वाराची ओळख पटली आहे.महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.तीचा पाय दोन ठिकाणी तुटला असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात दाखल केले.नांदा येथील पोलीस पाटील यांच्या सुचनेवरुन याप्रकरणी गडचांदूर पोलीसांनी बाईकस्वारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त महिलेची Accidental woman परिस्थिती अत्यंत हलाखीची असून बाईकस्वार Ultratech Cement Company मध्ये स्थाई नोकरीवर आहे.पहाटेची शिफ्ट असल्याने तो गडचांदूर वरून येत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे.महिलेवर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.दरम्यान येथील काही राजकीय लोकांनी याप्रकरणात मध्यस्थी करून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत उपचारासाठी या अपघातग्रस्त महिलेची चंद्रपूरला रवानगी करून दिली होती. मात्र मदत अजूनही मिळाली नसल्याने सदर महिला अडचणीत सापडली असून येथील एखाद्या सुजाण नागरिकांनी या महिला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली पाहिजे अशी भावना व्यक्त होत आहे.पुढील तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
मला कोणतीही जाहिरात पहायची नाही एकच जाहिरात वारंवार दाखवता
उत्तर द्याहटवा