News34 Chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरीता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.Employment opportunities
फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक,टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, सिओई ऑटोमोबाईल, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कार्पेंटर, शीट मेटल वर्कर आदी ट्रेड व्यवसायातील उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार तथा शिकाऊ उमेदवारीसाठी जागा उपलब्ध आहेत. Apprentice candidates
या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंधित ट्रेड प्रमाणपत्र तथा शालेय प्रमाणपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र.ही.दहाटे यांनी केले आहे.