घुगूस - चोरी, घरफोडी अपहरण व हत्या असे गंभीर प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत असून जणू गुन्हेगारचं आता पोलिसांना आवाहन देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरातील इंदिरा नगर वसाहतीत राहणाऱ्या संदीप परेकर यांच्या घरी अज्ञात चोरांनी ताला तोडत 22 हजार रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. #News34
त्या वसाहतीत तब्बल 6 घरांमध्ये सुद्धा त्याच रात्री अज्ञात चोरांनी प्रवेश करीत घरातील वस्तूंची नासधूस सुद्धा केली.
त्या वसाहतीत राहणारे संदीप परेकर, हरडे, रघुनाथ टोंगे, राम माहुली, गणपत उईके, प्रफुल ढवळे व राजकुमार सावे यांच्या घरी सदर प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत पुढील तपास घुगूस पोलीस करीत आहे.
याआधी शहरातील ज्वेलरी शॉप, व एका घरात लाखोंची चोरी झाली होती मात्र घुगूस पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला नाही या 2 प्रकरणातून फक्त ज्वेलरी शॉप चोरी प्रकरणातील आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले.
मात्र शहरात वाढती गुन्हेगारी बघता आरोपीचं आता पोलिसांना आवाहन देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात अवैध दारू, रेती माफिया आधीच सक्रिय असून आता सट्टा बाजाराची भर पडली आहे.
येणाऱ्या काळात शहरातील गुन्हेगारीवर पोलीस कसे नियंत्रण करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.