चंद्रपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनसामान्यांचे अतोनात हाल झाले, आजही नागरिक कोरोनाच्या तिव्रतेपासून अजूनही सावरले नाही.
अनेकांचे हातावरचे काम गेले, आजही नागरिकांची रोजगारासाठी भटकंती सुरू आहे.
या दुःखातून नागरिकांना सावरण्याचे काम तुकूम येथील माणिनी बहुउद्देशीय मंडळ करीत आहे.
गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूचे वाटप माणिनी बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले होते, याच धर्तीवर पुन्हा या मंडळाने गरजवंतांना कपड्यांचे वितरण केले.
माणिनी बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा चैताली नवले यांनी गरजवंतांच्या मदतीसाठी अनेकांना मदतीचे आवाहन केले होते, त्यानुसार नागरिकांनी विविध प्रकारे माणिनी मंडळाच्या अध्यक्षा नवले यांच्याजवळ मदत पोहचवली.
माजी महापौर अंजली घोटेकर व प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका शिला चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना 200 साड्या व 100 शर्ट पॅन्ट सहित लहान मुलांना कपड्याचे वितरण करण्यात आले.
मंडळाच्या अध्यक्षा चैताली नवले यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे व गरजवंतांना नागरिकांनी दिलेला मदतीचे आभार मानले.
आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या सचिव वर्षा सुरंगळीकर, भारती उपाध्ये, वनिता भोगेकर, स्वाती गोरडवार, सविता पोळे यांनी अथक परिश्रम केले.