घुघुस - उत्तरप्रदेश राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू असून सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रचारात रमले आहे.
3 फेब्रुवारीला AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार Asuddin Owaisi यांच्या ताफ्यावर काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी गोळीबार केला. Firing On Asaduddin Owaisi Car
ओवैसी यांच्या वाहनावर 3 ते 4 राउंड फायरिंग झाली सुदैवाने कुणालाही काही इजा या हल्ल्यात झाली नाही. Asaduddin Owaisi's convoy
मात्र निवडणुकी दरम्यान सदर हल्ला हा राजकीय षड्यंत्रामधून झाला असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला.
सदर गोळीबार प्रकरणाची चौकशी करावी व ओवैसी यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी घुघुस AIMIM च्या पदाधिकाऱ्यांनी घुघुस पोलीस स्टेशनमध्ये निवेदनामार्फत केली आहे.
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या रिंगणात AIMIM पक्षाची भूमिका अत्यन्त महत्वाची असून खासदार ओवैसी हे पक्षाचे स्टार प्रचारक सुद्धा आहे.
अश्यावेळी त्यांच्या सुरक्षेत चूक होणे हे षड्यंत्रचा भाग होऊ शकतो. aimim chief asaduddin owaisi
निवेदन देते वेळी घुघुस aimim अध्यक्ष साजिद सिद्दीकी, सोहेल शेख, अखतर हुसेन, इर्शाद वाहिद, इसराईल शेख, जुल्फकार शेख, अजाजूउद्दीन शेख आदींची उपस्थिती होती.