चंद्रपूर - स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक पध्दतीने शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ), नागपूर मार्फत चंद्रपुर जिल्हयातील 130 विदयार्थ्यांना टॅब व सीमचे मोफत टॅब वाटप करण्यात येणार आहे. Mahajyoti
महाज्योती, नागपूर मार्फत विजय वड्डेटीवार, मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तथा पालकमंत्री, चंद्रपुर यांच्या हस्ते टॅब वाटपाचा कार्यक्रम 19/11/2021 रोजी दु . 12 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपुर येथे होणार आहे. या कार्यक्रमास जि. प. चंद्रपूर च्या अध्यक्षा, सौ. संध्याताई गुरनूले चंद्रपुर महानगर पालिकेच्या महापौर राखीताई कंर्चालावार, खासदार सुरेश धानोरकर, खासदार अशोक नेते, विधान परिषदेचे आमदार ना.गो. गानार, डॉ. रामदास आंबटकर, अभिजित वंजारी, विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार, किर्तीकुमार भांगडिया, सुभाष धोटे, सौ. प्रतिभाताई धानोरकर, किशोर जोरगेवार महाज्योती चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे, दिवाकर गमे, लक्ष्मण वडले तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा परिषद चंद्रपूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी उपस्थित राहणार आहेत.
Pallavikhirwatkar@gmail.com
उत्तर द्याहटवा