प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - पाचगाव आर्वी क्षेत्रातील 28 विद्युतपंप धारक शेतकऱ्यांचे बिल थकीत असल्यामुळे स्थानिक एमएससीबी Mseb प्रशासनानी डी.पी लावली नाही.
सोयाबीनचे पीक निघाल्यानंतर कडधान्याला पाण्याची गरज असते आणि त्यासाठी विद्युतपंपाद्वारे पाणी पुरवठा केल्या जातो.
परंतु वीजबिल थकीत आहे अशे सांगून डी बी बसवण्यात येत नाही आहे.
शेतकरी ओला दुष्काळातून आधीच सावरला नसून त्याला अश्या माध्यमातून अनेक त्रास सहन करावे लागत आहे.
शेतीचे नुकसान आणि दुष्काळ असल्यामुळे थकीत बिल भरण्याची परिस्थिती आज त्यांची नाही.
ही समस्या घेऊन शेतकऱ्यांसह शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली असता त्यांनी कुठलीही आश्वासक भूमिका न घेता शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. Shivsena
या प्रश्नावर 3 दिवसात तोडगा निघाला नाही तर सर्व 28 शेतकऱ्यांसह मी स्वतः आत्मदहन करेल असा इशारा बबन उरकुडे यांनी दिला.