News34 chandrapur
चंद्रपूर - मार्च महिन्यात संपूर्ण राज्यात उष्णतेचे वातावरण असते मात्र यंदा हवामान बदलामुळे मार्च महिन्यात पाऊस पडत आहे, पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला असल्याने अनेक ठिकाणी पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra whether update
विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Orange alerts
हवामान विभागाकडून 15 ते 18 या कालावधीतील हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 16 मार्च रोजीसाठी पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर राज्यात सर्वदूर गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Monsoon in summer season
अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतमालाचं प्रचंड नुकसान झालेलं असतानाच पुन्हा एकदा अवकाळीसह गारपिटीचं संकट घोंगावू लागलं आहे. महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसासह वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.