News34 chandrapur
चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांच्या संकल्पनेतून आयोजित युवासेना व अस्पायर प्रोफेशनल अॅकडमी संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी पोलीस भरती परिक्षेसाठी सराव व्हावा व जास्तीत जास्त युवक पात्र ठरून पोलीस प्रशासनात जिल्ह्याचं नेतृत्व करून देशासाठी सेवा द्यावे या उद्दात हेतूने दिनांक १० मार्च पासून ते १५ मार्च पर्यंत रोज १०वाजता A2 शास्त्री नगर चंद्रपूर पब्लिक स्कूल च्या समोर बंगाली कॅम्प ,चंद्रपुर येथे पोलीस निशुल्क पोलीस भरती टेस्ट सिरीज २०२३ चे आयोजन करण्यात आले. Police recruitment test series
यासाठी जिल्ह्यातील युवकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.रोज विद्यार्थी येथे येऊन या संधीचा ला़भ घेत असून या आयोजनाबद्दल आभार व्यक्त करीत आहे.
युवकांच्या उत्फुर्त प्रतिसाद मागणी वरून आयोजक युवासेना विभागीय सचिव (म.रा.), सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे व सहआयोजक झाडे सर यांनी पुढिल २२ मार्च पर्यंत या निशुल्क सराव परीक्षेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Yuvasena chandrapur
त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर शिवसेना -युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने करण्यात आला आहे व अधिक माहितीसाठी 8830136419, 9503448802 या क्रमांकावर संपर्क साधावा.