News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात मागील 2 दिवसापासून जुन्या पेंशन योजना सुरू करावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले मात्र या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका रुग्णालय व शिक्षण विभागाला बसला आहे.
Old pension scheme protest
आंदोलनामुळे शिक्षक शिकवायला येत नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी रस्ता रोको आंदोलन केले.
Student road block protest
चंद्रपूर जिल्ह्यात संपामुळे मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक शाळेत यावेत या मागणीसाठी रास्ता रोको केला. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात हा प्रकार घडलाय. सकाळ पासून विद्यार्थ्यांनी सिंदेवाही-नवरगाव रस्ता ठप्प केलाय. जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग १ ते ७ च्या मुलांनी रास्ता रोकोत सहभाग घेतलाय. कोरोना काळात आधीच आमची २ वर्ष वाया गेली आहेत आणि आता शिक्षकांच्या संपामुळे आमचं नुकसान होतय त्यामुळे वर्गात शिक्षक आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. Zilla parishad school chandrapur
विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस लाडबोरीकडे रवाना झाले होते, त्यांनी सदर समस्या हाताळत विद्यार्थ्यांची समजूत काढत तात्काळ 2 शिक्षकांची व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
Government employees in the state have started agitation for the demand of starting old pension scheme since last 2 days, due to agitation, government work has been obstructed in many places and important work of citizens has also stopped. Zilla Parishad schools have also been hit the hardest, in Zilla Parishad school in Ladbori in Sindewahi taluka of Chandrapur district, the students staged a road blockade as the teacher was not coming to school.