News34 chandrapur
चंद्रपूर - मित्राने चारचाकी वाहन घेतल्यावर त्याची पार्टी करायला गेलेल्या युवकांचा त्याच चारचाकी वाहनाने भीषण अपघात झाला, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 4 मित्र किरकोळ जखमी झाले.
चंद्रपूर शहरातील 5 मित्रांनी रविवार असल्याने चारचाकी वाहन घेतल्याची पार्टी करायला गेले, तिथे जाण्यापूर्वी मित्रांनी मद्यपान करीत पार्टी केली, मात्र लोहारा येथील मार्गावर हर्षल पारखी याने वाहन मी चालवितो म्हणत गाडीची स्टेअरिंग हातात घेतली. Road accident
वाहनातील युवक हे मद्यपान करून असल्याने त्यांनी धावत्या वाहनात स्टंटबाजी केली, त्यांच्या स्टंटबाजी चे दृश्य अनेकांनी बघितले.
वाहनाचा वेग जास्त असल्याने वाहन अनियंत्रित होत पलटी झाले. Uncontrolled vehicle overturn
सदर वाहन हर्षल पारखी याच्या अंगावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, इतकेच नव्हे तर वाहन पलटी झाल्यावर इतर मित्रांनी तिथून पळ काढला. Vehicle rollover accidents
गावातील नागरिकांनी मृतक हर्षल ला बाहेर काढत रुग्णालयात नेले, मृतक हर्षल ला 8 महिन्याची लहान मुलगी आहे, हर्षल च्या मृत्यूने पारखी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
