News34 chandrapur
मुंबई/दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री मधील बिग बजेट चित्रपट RRR च्या नाटू नाटू या गाण्याला oscar Award पटकावीत मोठा इतिहास रचला.
नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. RRR movie songs
बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. Golden globe award
याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे. Oscar award win
या गाण्याला शूट करायला 20 दिवस लागले आणि 43 रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण करण्यात आली होती. याच वीस दिवसांत कलाकारांनी रिहर्सलसुद्धा केलं होतं. नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती.
