News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - कृषक भारती को.ऑप. चंद्रपूर (कृभको) याच्या वतीने पेय जल योजना याविषयी मुल तालुक्यातील चिमढा येथे दि.10.03.2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिमढा येथे शेतकरी मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन करून सभेची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटक मा. बी.एस. चव्हाण, विभागिय व्यवस्थापक (कृभको) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कालिदास खोब्रागडे, सरपंच प्रमुख अतिथी मा. पियुष नेमा जिल्हा व्यवस्थापक (कृभको), गुरूदास चौधरी सर नवभारत विदयालय मूल, आदर्श व उत्कृष्ठ शेतकरी महेश पाटील कटकमवार, जमनादास गोंगले पोलीस पाटील, योगेश लेनगुरे उपसरपंच, रूषीदेव नागोशे अध्यक्ष शाळा व्यवस्थपन समिती, डॉ. गजानन चौधरी माजी सरपंच, सौ. सविता बोरूले माजी सरपंच, केंद्रप्रमुख सुनिल गेडाम सर, हिवराज ठेमस्कर ग्रा.पं. सदस्य, विनोद वसाके, मधुकर पोहने हे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बी.एस. चव्हाण साहेब कृभको कंपनीबद्दल तथा खताचे नियोजन याबद्दल मार्गर्शन केले. उत्कृष्ठ शेतकरी श्री. गुरूदास चौधरी यांनी पाण्याचा योग्य नियोजन करून उत्पादन क्षमता वाढवावी. असे मत व्यक्त केले. तर आदर्श व उत्कृष्ठ शेतकरी श्री. महेश पाटील कटकमवार यांनी पिक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना योग्य असे मौलिक मार्गर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक पियुश नेमा साहेब यांनी केले. आभारप्रदर्शन उपलंचवार मुख्याध्यापीका यांनी केले. कभको कंपनीतर्फे शाळेला आरो मशिनचे वितरण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. रांगणकर मॅडम, चुधरी सर, बल्की सर व शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षीका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी बांधव सर्व गावकरी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते.
