News34 chandrapur
चंद्रपूर - राज्याचा अर्थसंकल्प हा जनहिताचा असून याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया देत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणाले की राज्यावर कर्जाचा डोंगर असताना अनेक विभागाला भरीव निधी देण्यात आला मात्र तो येणार कुठून? विरोधी पक्षांनी आपल्या सरकारच्या वेळी ह्या कर्जाचे भान ठेवायला हवे होते, भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये राज्यावर कर्जाची टक्केवारी ही 18.23 होती.
महाविकास आघाडी सरकार मध्ये राज्यावर कर्जाची टक्केवारी ही 19.76 पर्यंत झाली, महाविकास आघाडी सरकारने कर्जाची टक्केवारी 3 टक्क्यांनी वाढविण्याचे काम केले, आता आमच्या सरकारने ही टक्केवारी 16.98 पर्यंत आम्ही आणली आहे. Sudhir mungantiwar
पुढे ही आम्ही कर्जाची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न करू.
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांचा समावेश केला असून लेक लाडकी, महिलांना एसटी मध्ये सवलत, महात्मा फुले जण आरोग्य योजनेत निधी ची वाढ, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ, नोकरदार महिलांसाठी शक्तीसदन योजना, निराधार योजनेत वाढीव अर्थसहाय्य, असंघटित कामगारांसाठी नवे महामंडळ, राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा पंचामृत च्या माध्यमातून करण्यात आली असून हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेसाठी असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Old pension scheme maharashtra
सध्या विरोधी पक्षांनी जुन्या पेन्शनचा मुद्दा पुढे केला आहे पण त्या योजनेला बंद करण्याचं पाप कांग्रेस - राष्ट्रवादी सरकारने केले आहे, वर्ष 2005 नंतर सदर योजना बंद झाली होती, त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा हा मुद्दा आहे, याबाबत न्यायालयात तारीख सुरू असून त्यावेळी कांग्रेस व राष्ट्रवादी ने कोर्टात जुन्या पेन्शन विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, स्वतः योजना बंद करायची आणि आता आमच्या सरकारमध्ये ती योजना सुरू करा असा अट्टाहास करायचा, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानपरिषदेत सूचक विधान करीत जुन्या पेन्शनबाबत अभ्यास समिती नेमली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कार्य म्हणजे मूर्ती विमानतळ, महाविकास आघाडी सरकारने मूर्ती विमानतळाच्या कामाची फाईल थांबवली, माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विमानतळासाठी दुसरी जागा शोधा असे निर्देश दिले.
मात्र ती जागा विमानतळासाठी योग्य होती, शिंदे-फडणवीस सरकारने मूर्ती विमानतळासाठी 147 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच मूर्ती विमानतळाचे काम सुरू होणार आहे.
शिवराज्याभिषेक चे यंदा 350 वे वर्ष आहे, आणि यावर्षी राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे, यासाठी 350 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आहे.
लंडनहून जगदंब तलवार, वाघनखे आणण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केला आहे.