News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - सर्वत्र जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येते.नेफडो टीम मुल तर्फे अशाच प्रकारचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.मुल येथील स्वकर्तृत्वावर, कुठल्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ नसताना पतीच्या हयातीत किंवा निधनानंतर स्वत:च्या मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन त्यांना स्वतः घ्या पायावर उभं करणाऱ्या महिलांना संस्थेच्या वतीने साडीचोळी,नारळ आणि रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीमती मंगला याटेवार यांनी फळ विकून मुलाला उच्च शिक्षीत केले.यांचा मुलगा प्रितम याटेवार हे सध्या मंत्रालयात नोकरीला आहेत, श्रीमती नंदा वाढई यांनी आरडी कलेक्शन करून मुलांना शिक्षण दिले.आज यांची मुलगी पोस्टमास्तर म्हणून नोकरीला आहे, श्रीमती सिमा सोनुले यांचे मुलं सध्या शिक्षण घेत असुन पतीच्या निधनानंतर त्यांनी संसाराची धुरा पानटपरी चालवुन सांभाळली आणि सौ.इंदुबाई गिरडकर यांचे पती अंध असूनही त्यांनी माघार न घेता मजूरी करून संसाराची धुरा सांभाळत दोन मुलींचे पदवी पर्यंत शिक्षण करुन एका मुलीचं लग्न केले आणि मुलाला शिक्षण देऊन आज त्यांचा मुलगा वेल्डर चे काम करत आहे.
अशा या चार कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन मुल तालुका टीम तर्फे साडीचोळी, नारळ आणि रोप भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवातीला प्रमुख पाहुणे सौ.गोडसे मॅडम तालुका कृषी अधिकारी सावली यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रास्ताविक भाषणात मुस्कावार मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मानवता विकास कार्य आणि संस्थेचे कार्य समजावून सांगितले.प्रमुख पाहुणे गोडसे मॅडम यांचे शाल श्रीफळ आणि पुष्परोप देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे गुणावत मॅडम,मेंढे मॅडम आणि वेळेवर उपस्थित झालेल्या सुरेखा बोमनवार चंद्रपूर तालुका अध्यक्षा यांचे पुष्परोप देऊन स्वागत करण्यात आले.चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षा अल्का राजमलवार यांना कालच मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाली म्हणून नेफडो टीम तर्फे पुष्परोप देऊन अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.गोडसे मॅडम,बोमनवार मॅडम, मेंढे मॅडम आणि रत्नमाला भोयर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वर आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात नागोसे मॅडम यांनी संस्थेच्या माध्यमातून आपण कुठल्या प्रकारचे कार्य करायला पाहिजे हे उपस्थितांना मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन मिरा शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन कुमुदिनी भोयर यांनी केले.
प्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्नमाला भोयर नागपूर विभाग सल्लागार, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, ललिता मुस्कावार नागपूर विभाग उपाध्यक्षा, कविता मोहुर्ले नागपूर विभाग सचिव,अल्का राजमलवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, गौरी चौधरी चंद्रपूर जिल्हा युवा सहसचिव, सुरेखा बोमनवार चंद्रपूर तालुका अध्यक्षा, मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा,मुल तालुका संघटिका शशिकला गावतुरे, नंदा शेंडे, माधुरी गुरनुले, वंदना गुरनुले, सुनिता खोब्रागडे, कल्पना मेश्राम, सुजाता बरडे, कुमुदिनी भोयर, मंगला बोरकुटे, रागिणी आडेपवार, गोडसे मॅडम तालुका कृषी अधिकारी, मेंढे मॅडम अंगणवाडी सेविका,गुणावत मॅडम, सत्कारमुर्ती श्रीमती मंगला याटेवार, नंदा वाढई, इंदुबाई गिरडकर,सिमा सोनुले आणि इतर महिला उपस्थित होत्या.उपस्थितांना चहा नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.