News34 chandrapur
चंद्रपूर : महाराष्ट्र अनेक समस्यांशी झुंजत आहे. प्रामुख्याने महिलांवरिल अन्याय, अत्याचार व न्याय देणारा एखाही कृतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात नव्हता.
एकही महिला मंत्री नसणा-या या शासनात महिलाप्रती उदासिनता दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत मागील राज्यशासनाने शक्ती कायदा अस्तित्वात आणला. परंतू कायद्यात त्याचे रुपांतर कधी होईल, तसेच राजस्थान, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना सुरु करा, प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण व शहरी भागात समान अर्थसहाय्य द्या, शासनात महिलाप्रती उदासिनता दिसून येत असल्याची खंत व्यक्त आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
एकही महिला मंत्री नसणा-या या शासनात महिलाप्रती उदासिनता दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत मागील राज्यशासनाने शक्ती कायदा अस्तित्वात आणला. परंतू कायद्यात त्याचे रुपांतर कधी होईल, तसेच राजस्थान, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना सुरु करा, प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण व शहरी भागात समान अर्थसहाय्य द्या, शासनात महिलाप्रती उदासिनता दिसून येत असल्याची खंत व्यक्त आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
Budget Session Maharashtra Assembly
सन २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मा. महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेत त्या बोलत होत्या.
राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करतांना त्यांनी चर्चेला सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यात महापुरुषांचे झालेले अपमान अवघ्या महाराष्ट्राने उघडया डोळयाने पाहिले आहे भविष्यात अशा प्रकारची कृती होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अशी देखील विनंती केली.
Insulting great men in Maharashtra
त्या म्हणाल्या, राज्यपाल महोदयांचे अभिभाषण ऐकत असताना राज्यशासनाचा कामाचा उल्लेख कमी तर प्रधानमंत्री महोदयांची प्रशंसाच अधिक होती असे प्रामुख्याने दिसून येते.
मागील अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी अनेक उद्योगाशी करार केले ते उद्योग लवकरच तयार व्हावेत. अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
Appreciation of Prime Minister Modi more
राज्यपालांच्या अभिभाषणात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी व जखमींना आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले परंतू, वन्यजीव व मानवी संघर्ष थांबविण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे याचा उल्लेख नाही. कारण मृत्यु पावलेला व्यक्ती हा त्या कुटूंबाचा आधार असतो आणि हा आधार हा पैशाने परत येणारा नसतो. राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख झाला परंतू एकटया चंद्रपूर जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक शेतकरी हे कर्जमाफी पासून वंचित असल्याकडे लक्ष वेधले.
त्यासोबतच राजस्थान, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश या राज्याच्या जुनी पेन्शन सुरु आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात येत असून महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना सुरु करा करण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी सभागृहात केली. त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेत अद्याप केंद्र सरकार कडून पैसे राज्याला प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अद्याप अर्धवट आहेत. त्यासोबत ग्रामीण भागात अर्थसहाय्य कमी आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात समान अर्थसहाय्य देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
Old pension scheme maharashtra
जगातील दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्र आहे. परंतु ज्या जमिनीवर हा प्रकल्प उभा आहे. तेथील भूमिधारक भूमिहीन आहेत. त्यांना अद्याप अनेक दशके लोटून देखील नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षा न घेता तात्काळ नोकरीमध्ये सामावून घेण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी सभागृहात केली.