News34 chandrapur
चंद्रपूर/वरोरा - शिवसेनेत शिंदे यांच्या बंडानंतर, कायदेशीर लढाईत पक्ष व निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे कडे देण्यात आले. Political breaking
आता उद्धव ठाकरे यांना पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम सुरू केले असून सध्या महाराष्ट्रात शिवगर्जना यात्रा सुरू करण्यात आली आहे. Shivsena crisis
विदर्भात सेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हाती धुरा देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात शिव गर्जना यात्रेत खैरे यांनी भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले मात्र यात्रेदरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांची गटबाजी चांगलीच रंगली. Uddhav thackeray shivsena
वरोरा विधानसभा क्षेत्रात 2 शिवगर्जना सभा घेण्यात आल्या, त्याचं कारण शिवसेना जिल्हाप्रमुख (वरोरा, ब्रह्मपुरी व चिमूर क्षेत्र) मुकेश जीवतोडे व नव्याने विधानसभा संघटक पद मिळालेले रवींद्र शिंदे यांच्यातील फुटीमुळे पक्षावर 2 सभा घेण्याची वेळ आली.
वेळेवर भद्रावती येथे खैरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र सभेला वेळ झाल्याने बराच उशीर झाला, त्यानंतर खैरे सोबत असलेले नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी वरोरा येथील शिवगर्जना सभास्थळ गाठले मात्र अनेक उशीर झाल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला व त्यांनी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत, विधानसभा संघटक हे पद मोठं की जिल्हाप्रमुख पद? अश्या प्रश्नांचा मारा सुरू केला.
त्यानंतर नागपूरच्या पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
नागपूरच्या पदाधिकाऱ्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेत फूट पडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करीत पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला.