News34chandrapur
मुंबई - तिचं रक्त वाया जाऊ देऊ नका, यावर मी बोललो तर माझ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला, मात्र त्या मुलीला न्याय कधी मिळणार, या राज्याची कायदा व सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
Shivsena mp sanjay raut press conference
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या संदर्भात संजय राऊत यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो ट्विट केल्याने राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, सरकारच्या कुटुंबात असलेल्या चुंबनाच्या प्रकरणात SIT स्थापन करीत चौकशी सुरू होते मात्र गरीब कुटुंबातील मुलीवर जीवघेणा हल्ला झाला तर साधी चौकशी सुद्धा होत नाही, त्या मुलीच्या आईने माझ्याशी सम्पर्क साधत न्याय मागितला होता, मी माझ्या परीने आपली बाब मुख्यमंत्री पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला होता. परिवाराला संवादाच्या माध्यमातून वाचवा
त्या मुलीवर झालेल्या इतर अत्याचाराविषयी कोणताही उच्चार केला नाही, त्यात माझं काय चुकलं, असा सवाल राऊत यांनी केला.
बार्शी येथील अल्पवयीन मुलीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले छायाचित्र ट्विट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरून राऊत यांनी गृहमंत्री आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला.