News34 chandrapur
चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने प्रसिद्धीपत्रक काढून जिल्ह्यातील काही अनधिकृत निधी बँकेची नावे जाहीर करून नागरिकांनी या बँकेत गुंतवणूक करू नये, असा सतर्कतेचा इशारा दिला होता. या निधी बँकेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पारोमिता गोस्वामी, ॲड. कल्याणकुमार हे संचालक असलेल्या संपदा निधी बँकेचाही समोवश होता. दरम्यान, सोमवारी ॲड. गोस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत संपदा निधी बँक अधिकृतच असून, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच सुरू आहे. परंतु, आर्थिक गुन्हे शाखेने चुकीची माहिती देऊन बातमी दिली.
संपदा निधी अर्बन ही केंद्र सरकारच्या कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेली अधिकृत कंपनी आहे. कायद्यानुसार निधी कंपनीसाठी असलेल्या नियमावलीप्रमाणे संपदा अर्बन निधी लिमिटेड काम करीत असून, आतापर्यंत कोणत्याही ग्राहकांनी किंवा सभासदांनी कोणत्याही प्रकारची तक्रार बँकेकडे केलेली नाही. कोविड काळात २०१९ मध्ये या निधी बँकेची स्थापना करण्यात आली. यानंतर कोरोना काळात अनेक महिलांना कंपनीने स्वयंरोजगारासाठी कर्ज देऊन आत्मनिर्भर केले आहे. Ministry of corporates
निधी कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनीला मान्यता मिळाल्यानंतर एनडीएच ४ कंपनी मंत्रालयाकडे दाखल करावे लागते. संपदा अर्बन निधीने एनडीएच ४ दाखल केले आहे. कंपनी कायद्यानुसार ४५ दिवसांत एनडीएच ४ बाबत मंत्रालयाने निर्णय घेतला नाही तर डिम अप्रुवल आहे असे गृहित धरून व्यवसाय केला जातो. यानुसारच संपदा निधी अर्बनचे काम सुरू आहे. काही तांत्रिकी बाबीमुळे एनडीएच ४ ला मान्यता मिळाली नाही. मात्र, आम्ही याबाबत अपिल केले असून, एनडीएच ४ चा नवा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2022 पासून आम्ही नव्या गुंतवणूकदार सोबत आर्थिक व्यवहार केला नाही, आम्ही सध्या नवे सभासद सुध्दा वाढविले नाही, NDH4 चा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आम्हाला नवा सभासद जोडणे योग्य नाही, आम्ही सदर प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा केला आहे.
परंतु, ही निधी बँक अनधिकृत किंवा बनावट आहे असे म्हणणे चुकीचे असून, आर्थिक गुन्हे शाखेने दिशाभूल करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संपदा निधी बँकेकडे आजच्या तारखेत ४ कोटींच्या वर जमा ठेव असून, सर्वच गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक विजय सिद्धावार, घनश्याम मेश्राम उपस्थित होते.
Financial Offenses Branch Chandrapur
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक शेखर देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की कॉर्पोरेट मंत्रालयाकडून आम्हाला जी माहिती आली, ती माहिती आम्ही प्रसारित केली.
संपदा निधी अर्बन निधी लिमिटेड चे NDH4 नामंजूर करण्यात आले, त्यामुळे ते आता नव्या गुंतवणूकदारासोबत व्यवहार करू शकत नाही, त्याबाबत सदर माहिती आम्ही प्रसारित केली. याबाबत निधी संचालकांना चुकीचा गैरसमज करणे योग्य नाही. हे सर्व नियमानुसार करण्यात आले आहे.
The Director of Nidhi Bank has made an important disclosure that the information that no one should do financial transactions in Nidhi Bank in Chandrapur district was disseminated by Chandrapur Economic Crime Branch, but it also contained information that some Nidhi Banks in the district are unauthorized.
