News34 chandrapur
चंद्रपूर/मूल - मूल तालुक्यातील बेंबाळ गावात 90 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, मात्र त्या योजनेत पाणी पुरवठा समिती अध्यक्षाने लाखों रुपयांचा भ्रष्टाचार केला, सदर योजनेचे काम थंडबसत्यात पडले आहे.
भ्रष्टाचाराच्या या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भाजप पदाधिकारी व माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोणवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
बेंबाळ गावातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वर्ष 2015 मध्ये 90 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, योजनेचे काम पारदर्शक पध्दतीने व्हावे यासाठी बेंबाळ गावात पाणी पुरवठा समितीची स्थापना करण्यात आली होती, सदर समितीचे अध्यक्ष भाजप पदाधिकारी चंदू मारगोणवार हे होते.
समितीने कंत्राटदार दीपक गोनेवार यांना टप्प्याटप्प्याने 72 लाख 44 हजार 336 रुपये धनादेश द्वारे दिले, या कामात 1 हजार रुपयांच्या वर रक्कम ही चेक द्वारे देण्यात यावी अशी अट असताना सुद्धा समिती अध्यक्ष मारगोणवार यांनी 19 डिसेंम्बर 2017 ला 2 लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळविले व इतर रक्कम 11 लाख 40 हजार रुपये सदस्यांनी टप्प्याटप्प्याने सेल्फ कॅश काढली.
Corruption in water management
याबाबत गावकऱ्यांनी सदर भ्रष्टाचाराची तक्रार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांना दिली होती, याबाबत सेठी यांनी समिती नेमत चौकशी केली असता समितीकज्या चौकशी अहवालात पाणी पुरवठा समितीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे निष्पन्न झाले होते.
Rular Water supply scheme
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 7 एप्रिल 2022 रोजी सुनावणी घेतली व सुनावणी दरम्यान आरोपींवर 11 लाख 40 हजार रुपये व कंत्राटदाराचे 7 लाख रुपये वसुली निघाली हा अफरातफर केलेला निधी तात्काळ भरणा करावा असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती अध्यक्ष व समितीला दिले होते. त्यानंतरही भ्रष्टाचार केलेली रक्कम भरणा न केल्यामुळे दिनांक ८ जून 2022 ला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी उचल केलेली जादाची रक्कम कार्यालयात जमा करावी अन्यथा प्रशासकीय कारवाईस पात्र राहणार असे पत्र तत्कालीन पाणीपुरवठा अध्यक्ष व समितीला दिले. परंतु अद्याप एक वर्ष लोटूनही भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींनी 3 लाख रुपये जमा केली परंतु उर्वरित 8 लाख 40 हजार रुपये अजूनही दिले नाही.
भ्रष्टाचार करणाऱ्याला शासनातर्फे शिक्षा व्हावी व योजनेचे काम सुरळीत व्हावे यासाठी बेंबाळ गावातील नागरिकांनी आंदोलने, उपोषण केले मात्र मारगोणवार यांच्या पाठीशी भाजपचे राजकिय वरदहस्त असल्याने त्यांना अभय मिळत होता.
भाजप मध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही असे उदगार भाजपचे बडे नेते नेहमी करतात मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या मारगोणवार यांच्या विरोधात पुरावे असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शासनावर राजकीय दबाव तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये व्हायला लागली होती.
मारगोणवार यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कांग्रेसचे दीपक पाटील वाढई, प्रशांत उराडे, सरपंच चांगदेव काशिनाथ केमकर यांनी अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी सेठी यांची बदली झाल्यावर विवेक जॉन्सन हे नवे कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेत रुजू झाले, पुन्हा भ्रष्टाचाराचे हे प्रकरण सोबत घेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यासह दीपक वाढई, प्रशांत उराडे व चांगदेव केमकर यांनी निवेदन दिले, मारगोणवार यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा जॉन्सन यांना देण्यात आला.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विवेक जॉन्सन यांनी मारगोणवार यांच्याकडून वारंवार रक्कम देण्यासाठी होणारी टाळाटाळ बघता चंदू मारगोणवार व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल झाल्यावर त्याबाबत अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन यांनी 7 मार्च 23 ला काढलेल्या आदेशात दिले आहे.