News34 chandrapur
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्याची गरज असते. परंतु, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
चंद्रपूर - राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च ला राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला, अनेक चांगल्या योजना व घोषणांचा पाऊस अर्थसंकल्पात करण्यात आला, या अर्थसंकल्पावर चंद्रपुरातील जनप्रतिनिधी यांनी दिलेल्या संमिश्र प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. Maharashtra budget 2023 expectations
राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई / चंद्रपूर, दि. 9 : राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरवणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ना. फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे. विश्वगौरव मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारताला विश्व कप्तान बनविण्यात महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल त्या दिशेने नेणारा हा संकल्प आहे.
Maharashtra budget 2023 highlights
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले. राज्यातील शेतकऱ्याकरीता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकाना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत.
_________________
सर्वसमावेशक विकास साधणारा, राज्याला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - हंसराज अहीर
चंद्रपूर / शिंदे-फडणवीस सरकारने विधीमंडळात सादर केलेला व *अर्थमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला सन 2023-24 चा अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असुन तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याने शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबींसीसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास साधणारा सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित व महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
Maharashtra budget 2023 infrastructure development
या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय, केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ, धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी 1 हजार कोटी, महामंडळामार्फत 10 हजार कोटी बिनव्याजी कर्ज, इतर मागासवर्गीयांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे, 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविणार, लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर 5000, पहीलीत 4000, सहावीत 6000, अकरावीत 8000 व अठरा वर्षानंतर 75 हजार सरकार देणार, अंगणवाडी सेविका मानधन 10 हजार रुपये मदतनिस 5 हजार 500 रुपये, आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 3500 वरुन 5000 रुपये वाढ, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य अंतर्गत 5 लाखापर्यंत उपचाराची सोय, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार लाभार्थ्यांना 1 हजारावरुन 1500 रुपये वाढ केली, महिलांना एस टी प्रवासात 50 टक्के सुट, ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरांमध्ये विरंगुळा केंदाची स्थापना, आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्यामध्ये रस्त्यांसाठी 400 कोटीच्या तरतूदीने हा समाज विकासाकडे वाटचाल करेल. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ, वर्ग 5 वी ते 7 वी 1 हजार वरुन 5 हजार, 8 वी ते 10 वी 1500 वरुन 7500 याचबरोबर शिक्षणसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपयांची भरघोस वाढ, राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तसेच बालेवाडी पुणे येथे मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडुकरिता स्पोर्ट सायन्स सेंटरची उभारणी, अल्पसंख्यक महिलांसाठी 3 हजार बचत गट व कौशल्य विकास प्रशिक्षण व अन्य विविध क्षेत्रात विकास साधण्याची भुमिका अर्थसंकल्पातून पार पाडली आहे. सामाजिक, आरोग्य तसेच किडा क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारा निर्णय अर्थमंत्र्यांनी संतुलित व सर्वसमावेशी अर्थसंकल्पातून घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मच्छीमारांना 5 लाखाचा विमा, शेतकऱ्यांना शेततळी व मागेल त्याला शेडनेट हरितगृह यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा व रोजगार निर्मिती, रोजगारक्षम युवा, पर्यावरण पुरक विकास साधणारा हा अर्थसंकल्प असुन महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला साजेसा असा हा अर्थसंकल्प असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
Maharashtra budget 2023 agriculture budget
_____________
आगामी पराभव टाळण्यासाठी फडणवीसांचा जाहीरनामा : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळेच पदवीधर, शिक्षक व कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय संपादन केला. त्यामुळे आता १४ मार्च ला कोर्टाचा निकाल विरोधात येईल व निवडणूक जाहीर होतील. त्यामुळे आगामी पराभव टाळण्यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंचामृताचा माध्यमातून अर्थसंकल्पातुन जाहीरनामा वाचून दाखविल्याची खोचक टीका महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
Negative aspects of the budget
आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प होता. मात्र यामध्ये सर्वसमावेशक काहीच दिसून येत नाही. त्याउलट फक्त आश्वासनाची खैरात यामध्ये दिसून आली. समाजातील अनेक महत्वाच्या जातींतील नागरिकांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासोबतच या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. परंतु त्यांच्यावर वीज बिल मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. ते माफ करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष होत. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा या अर्थसंकल्पात केली असल्याची प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
__________
रुग्णसेवा, महिला, शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वरदान ठरणारा अर्थसंकल्प - आ. किशोर जोरगेवार
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. या अर्थसंकल्पात नवी घरकुल योजना, शेत विम्यासाठी मोठी तरतुद, महात्मा ज्योतीराव फुले जिवनदायी आरोग्य योजनेतील निधीमध्ये वाढ अशा महत्वकांशी घोषणा करण्यात आल्या असुन हा अर्थसंकल्प रुग्णसेवा, महिला, शेतकरी व मध्यमवर्गी कुटुंबांसाठी वरदान ठरणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
Maharashtra budget 2023 agriculture budget
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी नव संजीवनी ठरणार असुन यामध्ये रुग्णसेवेवर भर देण्यात आला आहे. आता ज्योतीराव फुले जिवनदायी आरोग्य योजनेतील निधीमध्ये भरघोस वाढ करित लाभार्थांना दिड लाख रुपये एैवजी आता पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक सहायता प्राप्त होणार आहे. निराधारांच्याही मानधनात 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रमाई आवाज योजनेसाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अतंर्गत शेतकर्यांना 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिल्या जाणार आहे., पंतप्रधान पिक विमा योजनेचे पैसे आता सरकार भरणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी तिन वर्षात 10 लाख घरांची नवी मोदी आवाज योजना सुरु करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. रमाई आवास योजने अंतर्गत दिड लाख घरे बांधण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातील या घोषणा सक्षम महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
________________
घोषणांचा पाऊस पाडुन राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा अर्थ संकल्प - माजी मंत्री आ. वडेट्टीवार
एकीकडे राज्यावर कर्जाचे डोंगर वाढतच असून राज्य रसातळाला जाण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी, कष्टकरी मजूर सर्वसामान्य नोकरदार, गृहिणी यांचे जीवन जगणे अवघड झाले असून यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम सरकार करीत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार व राज्यातील जनतेला दिलासा देण्याऐवजी केवळ घोषणांचा पाऊस पाडून सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा व महागाई ,बेरोजगारी तसेच राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचे अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प होय. Drawbacks of the budget
__________
सरकार कोसळण्याच्या भीतीने देवेंद्रचा पंचामृत
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची अर्थसंकल्प टिका
चंद्रपूर : येत्या १४ मार्च ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे त्यामुळे त्या दिवशी सरकार कोसळेल या भीतीपोटी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत अर्थसंकल्प सादर केला. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली नसल्याची खंत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.
Negative aspects of the budget
महाराष्ट्र राज्यातील उद्योग बाहेर राज्यात जात आहेत. परंतु या बजेटमध्ये उद्योग राज्यात यावेत किंवा रोजगार निर्मिती व्हावी या दिशेने कोणतीच तरतूद या बाजेमध्ये करण्यात आली नाही. जेव्हा विरोधात असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती. परंतु आता बजेट मांडत असताना मात्र यावर ब्र देखील त्यांनी काढला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येत आहेत. ते डोळ्यासमोर ठेऊन या बजेट मध्ये अर्थमंत्री फडणवीस यांनी जनतेला स्वप्नाच्या धुंदीत फिरवणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली आहे.
___________
शिक्षण क्षेत्रावर भरीव तरतूद नसलेला अर्थसंकल्प - आमदार सुधाकर अडबाले
Maharashtra budget 2023 education budget
राज्याचे शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर आणि शिक्षण क्षेत्रावर कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. हा सर्वात मोठा अन्याय आहे. शाळेत येणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता म्हणून केवळ एक रुपया दिला जातो. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मृत किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसंदर्भात जुनी पेन्शन लागू करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात पांदण रस्त्यांसाठीसुद्धा तरतूद केलेली नाही. मागील २० वर्षांपासून विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या प्रश्नाबाबतही कोणतीच तरतूद केलेली नाही. केवळ नवीन महामंडळे स्थापन करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करतो. परंतु, २ मे २०१२ नंतर शिक्षकांच्या भरतीस बंदी असल्याने प्रत्यक्ष लाभ कोणालाही मिळणार नाही. शिक्षण क्षेत्रावर मोठी तरतूद नसलेला हा अर्थसंकल्प आहे.
--------------
शेतीविकास व ओबीसी विकास साधणारा अर्थसंकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
ओबिसींसाठी दहा लाख घरे बांधून देणार असल्याच्या घोषणेचे स्वागत
शिंदे फडणविस राज्य सरकारने आज (दि.९) ला सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे.
शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, असंघटीत कामगार, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरीक, आदिवासी, ओबीसी, तथा नदीजोड, सिंचन, रस्ते आदी भौतिक सुविधांसाठी भरीव योजनांचा विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे. इतर मागासवर्गीयांसाठी पहिल्यांदाच दहा लाख घरे बांधणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे शेतीविकास व ओबीसी विकास साधणारा अर्थसंकल्प असल्याचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
शेतीविकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे. शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान, राज्याच्या विकासासाठी निती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा काढता येईल, शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानात वाढ, सेंद्रिय शेतीला चालना, उपग्रह आणि संगणकाची मदत घेवून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांच्या वार्षिक मदतीत वाढ, एकात्मिक पीक आधार आराखडा, मागेल त्याला शेततळ व ठिबक, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा, मच्छीमारांसाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष, नदीजोड प्रकल्प, गोसीखुर्दसाठी १५०० कोटीचा निधी, रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करणार, जलयुक्त शिवार योजना दोनची सुरुवात, मुलींसाठी लेक लाडकी योजना, पिडीत महिलांसाठी शक्तीसदन, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील निधीत भर, ज्येष्ठांना वैद्यकीय सुधारणा, आपला दवाखाना राज्यभर, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, साखळी व्यवस्थापन प्रणाली, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आदी योजनेत वाढ, आदिवासी आश्रम शाळांना आदर्श शाळा करण्याची योजना, टॅक्सी, रिक्षाचालक, असंघटीत कामगार यांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना, रस्ते आणि पुलांच्या प्रकल्पा निधी, मातोश्री ग्राम समृध्दी पांदन योजनेत नव्या योजनांचा समावेश, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा पुढील टप्पा सुरू, बिरसामुडा, संत सेवालाल जोडरस्ते योजना, गोंडवाना विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणार, आदी सर्वसमावेशक भरीव अशा विकास कामांचा हा अर्थसंकल्प आहे.
राज्यातील सर्व कल्याणकारी योजनेत केलेली भरीव वाढ व नवीन योजनांची निर्मिती या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात पहिल्यांदा इतर मागासवर्गीयांचा विचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प राज्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
_____________
सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प - रामू तिवारी
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्याची गरज असते. परंतु, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
Budget failures and criticism
---------------
बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प - मंगेश गुलवाडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी शासनाने 350 कोटी रुपयांची तरतूद केली हेच नाहीतर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व्यवस्थित नियोजन केले आहे.हा अर्थसंकल्प बळीराजाला बळ देणारा आहे.
राज्यशासन आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यान तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करणार आहे.यामुळे महाराष्ट्राची मान उंचावणार आहे.
अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित आहे.
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
, पर्यावरणपूरक विकास हे ध्येय या अर्थसंकल्पातुन स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता
12,000 रुपयांचा सन्माननिधी
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष बळीराजाला मिळणार.
याचा लाभ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार
शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता त्यामुळे
3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषिविकास अभियान,तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा शासन तयार करणार.5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असतांन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ देखील मिळणार आहे.
2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देण्याची घोषणा हे महत्वाचे पाऊल असून
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा केल्याने बळीराजा सुखावला आहे.हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.
----------
Weaknesses of the budget
ओबीसी समाजासाठी 3996 कोटी रुपये बजेट मध्ये तरतूद केली ती अपुरी असून लोकसख्येच्या प्रमाणात निधी देणे गरजेचे होते, दिलेला निधी अपुरा आहे , नव्यानेच सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ७२वसतिगृह प्रमाणे प्रत्येकी ऐक मुलांचे व ऐक मुलींचे वसतिगृह सुरू करण्या साठी परिपत्रक काढले असून त्या वसतिगृहाचा खर्च कुठून भागविणारा ? , वसतिगृहात प्रवेश नसणाऱ्या विद्यार्थांना स्वाधार योजने साठी निधी कुठून आणणार प्रश्न उपस्थित होतो आहे. सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ