News34 chandrapur
चंद्रपूर : होळी व धुलीवंदन हा सण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अतिउत्साही नागरिक व तरुणमंडळी मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. Rash driving
तसेच रोडने रॅश ड्राइविंग, स्टंटबाजीसारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जिवीतहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असल्याने किंवा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. Holi 2023
नागरिकांनी मद्यप्राशन करून रोडने रॅश ड्रायव्हिंग, स्टंटबाजीसारखे कृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. drunk & drive case
जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक कार्यवाही करणे सुरू आहे. drink and drive rules
या सणानिमित्तसुद्धा कारवाईची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी, सर्व नागरिकांनी सण साजरा करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.