News34 chandrapur
चंद्रपूर - राजूरा तहसील कार्यालयात शौचालय आहे परंतु स्त्री आणि पुरुषांचे शौचालय जवळजवळ लागलेले आहेत दोन्हीही शौचालयाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, दारूच्या बाटल्या पडलेल्या, घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले अश्या स्थितीत तालुक्याभरातून तहसील कार्यालयात येणाऱ्या महिला पुरुषांना जणू शौचालयच उपलब्ध नाही कार्यालयाच्या आतील भागात असलेल्या शौचालयाला नेहमी टाळा लागलेला असतो तर फक्त कार्यलयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता उघडला जातो आणि परत कुलूप बंद केले जाते.
Chandrapur vanchit bahujan aghadi
एकीकडे केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान देशभरात राबवत असून राजूरा तहसील कार्यालयातील अधिकारी उदासीन दिसत असून या अभियानाचा धज्जा उडवितांना दिसत असल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केला आहे.
VBAForIndia
राजूरा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकार असलेल्या शौचालय व संबंधित गरजा तात्काळ सोडवण्यासाठी शौचालया समोर वेलकम असे लिहून व घंटा बजाओ आंदोलन केले आणि तात्काळ शौचालय कामाची दखल घेऊन कार्य करावे अन्यथा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही यावेळी वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला.
Toilet
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश लिंगमपल्लीवार, तालूका अध्यक्ष सुशील मडावी, तालूका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, सुजाता नळे महिला तालूका महासचिव, वैशाली दुबे, तालूका उपाध्यक्षा, तालूका सदस्य महेंद्र ठाकूर, सदस्य शंकर झाडे, अविनाश मुन, प्रतीक दुर्गे, शिलचंद्र दहागावकर, राहुल रत्ने, अक्षय रत्ने व मयूर आईलवार आदी वंचित च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.