News34 chandrapur (प्रकाश हांडे)
चंद्रपूर - जगात महिला पुरुषांच्या समोर निघाल्या आहे, आज समाजात पुरुषांप्रमाणे जास्त मान महिलांना देण्यात येतो.
विविध क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांची सरशी आहे, शासकीय विभागातील मोठ्या पदावर आज महिला विराजमान आहे, लहान ते मोठं पद यावर सुद्धा आज देशात महिलाराज दिसत आहे. Woman's day 2023
जगातील भारत देशातील मागासलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज महिला राजकीय, सामाजिक, खाजगी क्षेत्र, शासकीय क्षेत्रात अग्रेसर आहे.
आज आपण एक महिला, पत्नी, आई, गृहिणी, मुलगी, बहीण व व्यवसायाने डॉक्टर असल्याची जबाबदारी बेधडक पणे पार पाडत आलेल्या डॉ. अभिलाषा यांच्याबद्दल जाणून घेणार आहो. Woman's empowerment
डॉक्टर असलेल्या अभिलाषा यांचं सामाजिक क्षेत्रात नाव मोठं आहे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
मूळच्या शेगाव येथे राहणारे बेहेरे कुटुंब, त्या कुटुंबात 2 जुळ्या बहिणी, काही कालांतराने वडिलांची पोस्टिंग नागपूर मध्ये झाली, दोन्ही मुलींना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न वडिलांनी उराशी बाळगले होते.
MBBS साठी दोन्ही बहिणींचा नंबर लागला आणि सुरू झाला वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास. Dr. Abhilasha gavture
Student लाईफ मध्ये वैद्यकीय क्षेत्राचे धडे गिरवीत असताना अभिलाषा यांची ओळख डॉ. राकेश गावतुरे यांच्यासोबत झाली.
दोघांच्या विचारात साम्य होते, चांगले मित्र बनल्यावर दोघांनी विवाह करीत चंद्रपूर शहरात त्यांनी हॉस्पिटल थाटले.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी किलबिल नावाचं हॉस्पिटल सुरू केले, अनेकदा त्यांनी गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले आजही त्या गरजूंवर उपचार व मदत करताना दिसतात.
कोरोनाचा भीषण काळ आला, त्यावेळी अनेक डॉक्टरांनी रुग्णांकडून तपासणी शुल्कासहित हजारो रुपये औषध लिहून देण्यासाठी आकारले, मात्र डॉ. अभिलाषा यांना सदर बाब पटत नव्हती, त्यांनी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार व्हावे यासाठी निःशुल्क मार्गदर्शन व औषधी वितरणाचे काम त्यांनी केले, त्यांच्या या निर्णयानंतर अनेक डॉक्टरांनी गावतुरे यांचा बोध घेतला.
वर्ष 2020 मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेने महत्वाचे पाऊल उचलत चंद्रपूर तालुक्यातील तब्बल 54 कुपोषित बालकांना दत्तक घेतले होते.
हा राज्यातील पहिला प्रयोग होता, बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या चमू मध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा समावेश होता, विशेष म्हणजे बालरोग तज्ञांनी स्वखर्चाने कुपोषित बालकांवर उपचार केला होता, सोबतच 8 वर्षीय बालिकेला डॉ. अभिलाषा यांनी दुर्दम्य आजारातुन वाचवीत तिला मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले होते.
वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अभिलाषा गावतुरे यांचं योगदान व कार्य भरीव प्रमाणात आहे, या क्षेत्राशिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वर्ष 2020 ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज प्रकल्पाच्या चिमणीवर चढून विरुगिरी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी डॉ. अभिलाषा ठामपणे उभ्या होत्या, वीज प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा सुद्धा केला होता, आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारला अखेर नमावे लागले होते.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्ष 2023 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. 2020 सालचा पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा हिरकणी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि 2022 रोजी गावतुरे दाम्पत्यांना चंद्रपूर समाजभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.
यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात त्यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करीत साड्यांच्या दुकानात गर्दी करण्यापेक्षा महिलांनी पुस्तक खरेदी करण्यासाठी गर्दी करावी तो दिवस सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थाने अभिवादनाचा दिवस असेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून डॉ. गावतुरे यांनी अनेक आंदोलने उभारली आहे, कामगार, महिला, वंचित आणि अपल्पसंख्याणक वर्गाना न्याय देण्याचं काम ही डॉ. गावतुरे यांनी केले आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी चंद्रपूरत निघालेल्या भव्य ओबीसी मोर्चा असो व सी एन आर सी विरोधातील संघर्ष निदर्शने असो त्यांनी समाजाचे पुढे राहून नेतृत्व केलेले आहे
कोरोना काळानंतर राज्यात राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, त्यानंतर राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील मुलांना बसला, चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा येथील चेक आष्टा भागात वाघाची दहशत आणि शाळेत जायला वाहन नसल्याने विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या.
सदर बाब डॉ. गावतुरे यांना कळल्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी एसटी सेवा पूर्वरत सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत प्रवाससेवा सुरू ठेवली होती.
डॉ.गावतुरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल गावातील नागरिकांनी अनेक पुरस्कार देऊन त्यांचे आभार मानले आहेत.
समाजामधून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनि राजकारणात जाऊन समाजाचे प्रतिनिधीतव करावे असा सूर आता मोठ्या प्रमाणात उमटायला लागला आहे. त्यांच्यासारख्या अभ्यासू व प्रामाणिक ,समाजासाठी कळवळा असलेल्या व्यक्तीने थेट कायदेमंडळात जर समाजाच्या हक्काची लढाई लढली तर तो समाजासाठी सोन्याचा दिवस असेल.