News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - होळीचा सण कालच साजरा केला. आणि आजच एस.टी.महामंडळाचे चालक व वाहक आपल्या कर्तव्यावर हजर न झाल्याने आज दिनांक 8 मार्च २०२३ रोजी नेहमी जाणारी सकाळची मुल-पोंभूर्ना नियमित बस मुल बसस्थानकावरून सोडली नसल्याने मुल पोंभूर्ण मार्गावरील चक घोसरी, पिपरी दीक्षित, येरगाव,रेगडी,सिंतला, भेजगाव, हळदी, चीचाळा, ताडाला, यागावचे मुल येथे शाळेत येणारे विद्यार्थी त्या त्या गावच्या बसस्थानकाच्या रस्त्यावर अडून राहिल्याने शाळेच्या व परीक्षा सुरु असल्याने पेपरच्या वेळेत अनेक विद्यार्थी पोहचू शकले नाही. Msrtc
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस एस. टी. महामंडळाचे अधिकारी जबाबदार राहतील असे लेखी निवेदन मुल तालुका काँग्रेसच्या वतीने सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, चंद्रपूर जिल्हा काँग्रसचे महासचिव व नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर पीपरी दीक्षित ग्राम पंचायत सदस्य संदेश डोंगरे यांचे उपस्थितीत मुलचे वाहतूक निरीक्षक यांचेशी व जिल्हा वाहतूक कंट्रोलर श्री.गोवर्धन यांना मोबाईलवर संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सांगून सकाळी लेखी निवेदनही दिले. Congress news
सध्या स्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना आणि परिवहन मंडळाने विद्यार्थ्यांना नियमित बस पास दिली असताना सुद्धा नियमित बस का सोडल्या जात नाही याबाबत विचारणा करण्यात आली. जर परीक्षा कालावधीत नियमित बस वेळेवर सोडल्या गेली नाही तर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावर जिल्हा वाहतूक कंट्रोलर श्री.गोवर्धन यांनी तात्काळ बस सोडण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी राकेश रत्नावार व गुरु गुरनुले यांना मोबाईलवरून दिले. तसेच मुल बस स्थानकावरील वाहतूक निरीक्षक यांची कार्यालयीन वेळ सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत असताना देखील ते सायंकाळी ८ वाजताच घरी निघून जात असल्याचे प्रवाशी बांधवांनी सांगितले. यावर देखील जिल्हा वाहतूक कंट्रोलर यांचे मुल बसस्थानक यांचेवर नियंत्रण नसल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे दिसून आले.