News34 chandrapur (प्रकाश हांडे)
चंद्रपूर - आधी कुण्या दाम्पत्याला मुलगी झाली की त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहतो तो खर्चाचा डोंगर, मुलगा असता तर त्याने आपल्याला सांभाळलं असत, आता ही मुलगी आपल्याला काय सांभाळणार? असा विचार अनेकांना आधी यायचा मात्र काहींनी या विचारांच्या उलट काम केलं. International woman's day 2023
आई-वडिलांनी योग्य मार्गदर्शन केलं की मुलगा असो की मुलगी ते आपलं ध्येय नक्कीच गाठतात. #tjmm
मग ते मध्यमवर्गीय असो की गरीब कुटुंबातील, अशीच एक महिलेची नाहीतर तर चंद्रपुरातील तरुणीची ही कहाणी, ही कहाणी आपण ऐकली की नक्कीच आपल्याला यातून चांगला बोध मिळेल.
चंद्रपुरातील साई मंदिर वॉर्ड येथे राहणारे बुरीले कुटुंब, यामध्ये श्रीधर व किरण बुरीले यांना 2 मुली व 1 मुलगा.
जागतिक महिला दिनानिमित्त मानसी च्या संघर्षाची ही सत्य कहाणी आपल्याला प्रेरणादायक ठरेल हे निश्चितचं.
मानसी ला लहानपणापासून नृत्याची जाम आवड होती, आपण नृत्य क्षेत्रात पारंगत व्हावं अशी तिची इच्छा होती, तिने चंद्रपुरातील ADC डान्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला.
अनेक नृत्याच्या प्रकारात मानसी पारंगत झाली, तिच्या नृत्याचे व्हिडीओ ADC Dance Academy च्या youtube चॅनेल वरून झळकू लागले.
आपण या क्षेत्रात अजून पुढे जावं अशी तिची इच्छा होती, यासाठी तिने south इंडस्ट्री मधील सर्वात लोकप्रिय नृत्य कार्यक्रम Biggest Dance Reality Show Dhee Champions मध्ये भाग घेतला, तिचे नृत्य परीक्षकांना भारावले व त्या स्पर्धेत मानसी ने अंतिम फेरी गाठली.
त्यानंतर Dance Plus Telugu, Dhee Jodi 11 मध्ये सहभाग घेत स्पर्धा गाजविली.
स्पर्धेनंतर तिला Tollywood फिल्म इंडस्ट्री मधील ऑफर येऊ लागले.
साऊथ च्या Geetha Sakshi या चित्रपटात मानसीने Item Song केले.
या यशानंतर तिला नृत्याचे बादशाह प्रभुदेवा यांनी बोलावणे केले, आणि त्यानंतर मानसी ने यशाच्या शिखराचा प्रवास सुरु केला.
साऊथ चे power स्टार Pawan kalyan, Prabhudeva, Ravi Teja, shekhar master, yashwant master सोबत सहायक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले.
नुकतेच मानसी ने Bollywood चे dance गुरू गणेश आचार्य सोबत रणवीर कपूर व श्रद्धा कपूर अभिनित Tu Jhuthi Main Makkar चित्रपटातील Show Me Your Thumka या गाण्यात अभिनेत्यांना नृत्य प्रकारात सहयोग केला.
Tollywood व Bollywood चित्रपटातील मोठ्या अभिनेत्यासोबत अवघ्या 22 वर्ष वय असलेल्या मानसीला पुढे असंच काम करायचं.
मानसी ने चंद्रपुरातील विद्या निकेतन मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे, तिला मिळालेले यश अजूनही चंद्रपुरकरातील नागरिकांच्या ध्यानी नाही.
मानसी चा डान्स idol हे भारतीय सिने सृष्टीमधील प्रभू देवा आहे, त्यांच्या डान्स performance ने तिला नृत्य क्षेत्रात काही नवं करायची प्रेरणा मिळते.
या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मानसी ची आई किरण बुरीले यांनी नेहमीच पुढाकार घेतला, मानसी च्या यशात आज आई-वडिलांचा मोठा वाटा आहे.
चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यातून सरळ bollywood गाठायचा मानसी चा प्रवास खरंच वाखण्याजोगा आहे.
News34 तर्फे मानसीला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...