News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरुक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोंडाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शेतकरी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Farmer suicide news
जीवनदास नोमाजी पाल वय (45) वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जापायी बेजार झालेल्या या शेतकऱ्याने जमीन विकली होती. बँकेचा कर्ज असल्याने तो मार्च अखेर पर्यंत कसा भरावा या विवंचनेत असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. घराच्या मागील शेतात आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
Bank loan
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा वर्ग (९ वी) एक मुलगी वर्ग (७वी) आई भाऊ असा मोठा परिवार आहे. मुलाचा नुकताच नवोदय विद्यालयाकरिता नंबर लागला आहे मात्र मुलाचे यश पाहता देखील आले नाही. असे दुर्दैव या शेतकऱ्याच्या नशिबात आले.
शेतकऱ्याने गळफास घेतल्याने पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुल येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास मुल पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.
A farmer committed suicide by hanging himself due to indebtedness in Mool taluka of Chandrapur district. The farmer had mountains of debt in the month of March, how to pay that debt? Such a question was standing before the farmers.
