News34 chandrapur
चंद्रपूर - अंशदायी पेन्शन योजना बंद करीत जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी 14 मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. Old pension scheme
या संपात राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी सहभागी झाले आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ते 16 हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होत आंदोलन केले. Pension plan for employee
कर्मचारी संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाटाचे वातावरण पसरले होते. Statewide indefinite strike
राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून सेवा नियमित करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, याकडे दुलर्क्ष झाल्याने राज्य कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल, बांधकाम, कोषागार, पाटबंधारे, वनविभाग, उपनिबंधक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह 15 हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे. कार्यालय प्रमुख अथवा एक ते दोन कर्मचारी वगळता संपूर्ण कर्मचारी संपात सहभागी झाले.
Old pension scheme strike in maharashtra
As many as 14 lakh government employees in the state of Maharashtra have gone on an indefinite strike from today to demand the old pension scheme. 15,000 to 16,000 government employees in Chandrapur district have gone on indefinite strike to demand their old pension, due to which there was silence in many government offices in the district.

