News34 chandrapur गुरू गुरनुले
चंद्रपूर - जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये मूल पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेली झुरणी ही समाज प्रबोधनपर एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. Zilla parishad chandrapur
लक्ष्मण खोब्रागडे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या एकांकितेत स्त्रीभ्रूणहत्याचे दुष्परिणाम व उपाय याचा संदेश देण्यासाठी हर्षवर्धन गजभे, के. टी. खोब्रागडे, सुनील ठिकरे आणि सूरज आकनपल्लीवार यांनी साजेशी दमदार भूमिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. Female feticide
एकांकिकेला प्रथम पुरस्कार मिळाल्याने मूल पंचायत समितीत आनंदाचे वातावरण असून संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी चनफने, कक्ष अधिकारी थामदेव अगडे, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे व सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. drama