News34 chandrapur
चंद्रपूर - नुकत्याचं चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पार पडल्या, यामध्ये अनेक पोलीस अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यात गेले.
जाता-जाता पोलीस निरीक्षकांचे पोलीस कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभ घेत त्यांना आनंदमय असा निरोप देण्यात आला. Chandrapur police
मात्र चंद्रपुरातील दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत एकमताने असा ठाणेदार आम्हाला नेहमी मिळावा अशी भावना व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक धुळे यांची बदली भंडारा शहर पोलीस दलात झाली आहे. Police inspector
स्वप्नील धुळे हे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अनुभवी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात असताना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावत अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचविले होते. Farewell
त्यांच्या या कार्याचा पोलीस महासंचालकांनी गौरव सुद्धा केला होता, दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये निरोप समारंभ कार्यक्रमात धुळे यांनी मागील 2 वर्षांत दुर्गापुरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
मात्र आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी भरगच्च सहभाग नोंदवीत "आपल्या सारख्या खाकी वर्दीतील नियमात कर्तव्य पार पाडणारे व सर्वांची मदत करणारे पोलीस निरीक्षक म्हणून आपली ओळख आमच्या मनात राहील" अशी ग्वाही दिली.