News34 chandrapur
चंद्रपूर - 25 जानेवारी 2023 ला राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर विभागाने मूल येथे बनावट दारू कारखान्यावर धाड मारीत तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलीस पाटील गुरू संग्रामे व उमाजी झाडे यांना अटक करण्यात आली होती, मात्र सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोलू उर्फ पवन वर्मा, अरुणा मरसकोल्हे व राजू मडावी हे फरार झाले होते.
विशेष म्हणजे सदर बनावट दारूचा कारखाना महाविद्यालय व शेळी पालन च्या बॅनर खाली सुरू होता, बनावट दारू बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पिरिट चा साठा सुद्धा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला होता. Fake liquor
मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथक तयार करीत अनेक ठिकाणी धाडी मारल्या, आरोपींवर नागरिकांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी व भेसळ दारू बनविणे कलम 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाला आता आरोपीनी वेगळे वळण व तपास भरकटविण्याचा प्रयत्न केला आहे, गुरुवारी आरोपी 26 वर्षीय राजू श्यामराव मडावी हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सरेंडर झाला, काही वेळ तो कार्यालयात गिरट्या घालत होता, अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता तो शौचालयाचा बहाणा करीत निघाला आणि त्याने उंदीर मारण्याचे औषध पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Ethyl alcohol
त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, सध्या आरोपी मडावी याची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत आरोपीच्या कुटुंबाने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत राजू ला बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे, त्यांच्या मारहाणीमुळे राजू ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा सुद्धा मडावी कुटुंबाने आरोप केला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे, सर्व घटनाक्रम हा सीसीटीव्ही मध्ये कैद आहे, त्याला कुणी मारहाण सुद्धा केली नाही, शौचाचा बहाणा करून त्याने विष प्राशन केले मात्र हे सर्व आधी ठरविल्या गेलं होतं. Fake liquor factory in chandrapur
उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेल्यावर तो एकाच्या संपर्कात सुद्धा होता, त्याला जे आदेश मिळाले त्याने तसे केले जेणेकरून उत्पादन शुल्क विभागाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आरोपींचा हा प्रयत्न होता.
या प्रकरणाची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
मुख्य आरोपी गोलू उर्फ पवन वर्मा कोण आहे?
चंद्रपुरातील बाबूपेठ भागात हुडको कॉलोनी मध्ये गोलू वर्मा व राजू मडावी राहतात, सोबत त्या परिसरात अरुणा मरसकोल्हे सुद्धा राहतात, अरुणा मरसकोल्हे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यावर गोलू वर्मा ने अवैध दारू विक्री छोट्या प्रमाणात सुरू केली, झटपट पैश्याचा नाद त्याला लागला व त्यानंतर त्याने अवैध दारू चे अनेक ट्रक चंद्रपुर शहरातील अनेक भागात उतरविले, पोलिसांनी त्यावेळी वर्मा याचा ट्रक भरून माल सुद्धा पकडला होता, राजू मडावी हा गोलू कडे काम करायचा, काम-धंदे नसल्याने अवैध दारू विक्री त्याला सोपी वाटली.
मात्र काही वर्षांनी दारूबंदी उठविण्यात आली, आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
गुन्हेगारी क्षेत्राची डिग्री सोबतीला घेत गोलू, अरुणा व राजू ने मूल तालुक्यातील चितेगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू केला.
यासाठी महाविद्यालयाचा व शेळी पालनाचा बोर्ड बाहेर लावण्यात आला होता.
अरुणा ने लीज वर असलेल्या जमिनीवर बनावट दारू कारखाना उभा केला, मात्र त्याची कुणकुण उत्पादन शुल्क विभागाला लागल्याने आरोपींचे स्वप्न धुळीस मिळाले.
चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाकडे मोजण्याइतके कर्मचारी असताना त्यांनी मोठी कारवाई केली ती अतिशय प्रशंसनीय आहे, ज्याप्रमाणे बिहार राज्यात असंख्य नागरिकांचा बनावट दारू पिल्याने मृत्यू झाला होता त्या घटनेची पुनरावृत्ती उत्पादन शुल्क विभागाने होऊ दिली नाही.
मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग अथक परिश्रम करीत आहे लवकरचं मुख्य आरोपी अटकेत असणार अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आरोपीनी मोठ्या प्रमाणात बनावट दारू बनविण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातून आणलेलं इथिल अल्कोहोलचा प्रवास महाराष्ट्र राज्यापर्यंत बेधडक कसा काय झाला? त्या वाहनांची कुठेही तपासणी झाली नाही का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी गोलू उर्फ पवन वर्मा हा उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागत नसून तो सध्या विविध लोकेशन बद्लवित आहे, सध्या तो नांदेड मध्ये लपून असल्याची चर्चा आहे.