News34 chandrapur
मुंबई/दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाचेच असल्याचा निर्णय देत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. Uddhav thackeray
मात्र आता सध्या असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशाल हे सुद्धा अडचणीत आले आहे. Shivsena
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आलेलं मशाल चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी समता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेतली आहे. Shivsena crisis
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं अंतिम निकाल येईलपर्यंत पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. A burning torch
शुक्रवारी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल याच चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी याच पार्श्वभूमीवर समता पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले आहे.