News34 chandrapur
चंद्रपूर - वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात असलेल्या अतिक्रमनावर चंद्रपूर वनविभागाने बुलडोजर चालविला. Encroachment in chandrapur
सदर अतिक्रमण मोहिमेत तब्बल 14 धाबे वनविभागाने हटविले, मात्र या मोहिमेत महानगरपालिका हद्दीत असलेल्या छोट्या दुकानदारावर सुद्धा अतिक्रमणांची कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत प्रशासनातील तब्बल 100 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मूल रोडवर असलेल्या वानखेडे हायस्कुल समोरील चप्पलचे दुकान, नाश्ता सेंटर, चाय टपरी व पान सेंटर असे 8 दुकाने सुद्धा 17 फेब्रुवारीला प्रशासनातर्फे हटविण्यात आले.
आज पीडित दुकानदार यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला असा आरोप करीत या कारवाईमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून आमच्या उत्पन्नाचे स्रोत अतिक्रमण हटाव कारवाईत उध्वस्त करण्यात आले.
याबाबत पीडित दुकानदारांनी महानगरपालिका, पोलीस स्टेशन व वनविभागात चौकशी करीत सदर कारवाई कुणी केली अशी विचारणा करण्यात आली मात्र ती कारवाई आमची नसल्याचे प्रत्येकानी म्हटले. Chandrapur news
पीडित दुकानदार हे मागील 20 ते 25 वर्षांपासून मूल रोड वर व्यवसाय करीत कुटुंब चालवितात मात्र प्रशासनाच्या या कारवाईने मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे.
याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटून आमची व्यथा सांगत, त्यांना न्याय मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत दुकानदारांनी माहिती दिली.