News34 chandrapur
चंद्रपूर - संपूर्ण देशच नव्हे तर सर्व जगामध्ये प्लास्टिकचा वापर हा झपाट्याने वाढत आहे. ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचा अति वापर व योग्य विल्हेवाट होत नसल्याने पृथ्वीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
ह्यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने बालगोपाळांनी व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश संपूर्ण चंद्रपूरकरांना दिला आहे ,असे प्रतिपादन आरुषी सोशल फॉउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कल्पना गुलवाडे ह्यानी केले आहे. Excessive use of plastic
स्थानिक सेंट मायकेल शाळेच्या मैदानावरील अस्तव्यस्त फेकण्यात आलेल्या प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ राखण्याच्या कार्यक्रमात डॉ. कल्पना गुलवाडे बोलत होत्या.
ह्या संपूर्ण कामामध्ये इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या डॉक्टरांची मुले व सेंट मायकेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला. IMA Chandrapur
ह्या प्रसंगी भाजपा महानगर चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. बाळमुकुंद पालीवाल, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. गायत्री वाडेकर, डॉ. रिझवान शिवजी, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. प्रियंका पालीवाल यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरुषी सोशल फॉउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्रेरणा कोलते , डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. किरण जानवे, डॉ. ऋतुजा मुंदडा, गायत्री देशमुख, संदीप देशमुख, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य विकास कोल्हेकर. शिक्षक सुनिल वडस्कर. विद्यालयाचे स्वच्छता दूत वेदांत नेवळकर, यश ठोंबरे, आदित्य गहुकर, यांनी अथक परिश्रम घेतले.