News34 chandrapur
चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध २१ प्रकारचे खेळ खेळविले जाणार असुन मंगळवारी कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी 7 वाजता सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. MP shrikant shinde in chandrapur
या कार्यक्रमाला खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांची विशेष अतिथी म्हणून तर राजुरा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे, चिमुर मतदार संघाचे आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया आणि नागपूर पदविधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. Sports festival
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता खेळाची आवश्यकता आहे. त्यामुळे शारीरिक विकासासोबतच मानसिक सुदृ्ढता आणि दैनंदिन आयुष्यात खेळाडूवृत्ती निर्माण करण्याकरीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, पुरुष व महिलांचे खुले कबड्डी सामने, विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा, विसावे राष्ट्रीय कराटे स्पर्धा, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा, हँडबॉल स्पर्धा, नेटबॉल स्पर्धा, योगासन प्रतियोगीता, विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा, क्रिकेट सामने, जिल्हास्तरीय मैदानी खेळ स्पर्धा, जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धा, जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा, जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा तथा महिलांसाठी 17 प्रकारच्या विविध पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले असुन मतदार संघातील विविध भागात सदर खेळ खेळल्या जाणार आहे. मंगळवारी महापालिकेच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार असुन या आयोजनाला चंद्रपूरातील नागरिकांसह क्रीडा प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.