News34chandrapur
चंद्रपूर - वर्धा जिल्ह्याच्या सीमेजवळील पोतरा नदीच्या पात्रात शनिवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.
Tiger dead
Tiger dead
मात्र ती वनसीमा कुणाची यावर बराच वेळ लागला, आधी ती वनसीमा वर्धा जिल्ह्याची असल्याचे सांगत वनाधिकारी कुणी घटनास्थळी दाखल झाले नव्हते मात्र बऱ्याच अवधीनंतर तो वाघाचा मृतदेह चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याचे निष्पन्न झाल्यावर वनविभागाची चमू त्याठिकाणी दाखल झाली होती. Tadoba tiger
वणाधिकाऱ्यांनी मृत वाघाला चंद्रपूर टिटीसी सेंटर मध्ये नेत शवविच्छेदन केले, त्या वाघाचा मृत्यू संशयास्पद आहे असा अंदाज वर्तविण्यात लावण्यात आला असून त्या दिशेने वनविभागाने तपास सुरू केला आहे. Tiger safari
सदर मृत वाघ हा नर जातीचा असून त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला अशी चर्चा सुरू आहे, सोबतच त्या वाघाला दुसऱ्या ठिकाणी मारण्यात आले व नंतर नदीपात्रात टाकण्यात आले अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
वाघाच्या मृत्यूचा तपास सहायक वनसंरक्षक निखिता चौरे करीत आहे. Chandrapur tiger