News34 chandrapur
चंद्रपूर - हडस्ती (बल्हारपूर):- श्री सद्गुगुरू जगन्नाथ बाबा मुर्तीस्थापना व श्री. मारोती (महाराज) जन्मोत्सव सोहळा महोत्सव दि. 08/02/2023 रोज बुधवार ला ह.ज. प. प्रविण नवले महाराज यांचे किर्तनाने सुरूवात झाली. श्री. जय जगन्नाथबाबा यांच्या जय जयकाराने हडस्ती नगरी दुमदुमली. Chandrapur news
दि. 09/02/2023 रोज गुरूवारला पहाटे तरूणवर्ग व समस्त नागरीकांनी ग्रामसफाई केली व महिलांनी घरासेमार रांगोळी टाकली, गावातील सर्व नागरीक शेतीकडे पाठ दाखवुन पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते व महिलामध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. श्री. जगन्नाथ बाबा मंदिर (नविन वस्ती) येथुन सकाळी 10 वाजता श्री. मारोती महाराज यांची दमनीमध्ये बसुन पालखी सोहळयाला सुरूवात झाली.
गावातील तरुणवर्ग यांनी पालखी सोहळयामध्ये सहभाग असणा-या भजन मंडळी व भाविक भक्तांसाठी अल्पोहार व श्री. जगन्नाथ बाबा काळा याची व्यवस्था केली होती. पालखी सोहळा झाल्यानंतर काल्याचे किर्तन ह.भ.प. साखरकर महाराज व दहीहंडी श्री. मारोती महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
पालखी सोहळयामध्ये उपस्थित झालेल्या सर्व भजन मंडळीचे मंदिरातर्फे सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्यामध्ये श्री. पावडे महाराज (कायर-पिपरी), श्री. पवन महाराज (विठ्ठलवाडा) श्री. पावडे महाराज (हिरापुर) व गावोगावुन आलेले हजारो भाविक भक्त उपस्थित होते. गावातील नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.