News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील मौजा राजोली येथील शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे सर्वांनाच सोबत घेऊन चालणारे साधे सरळ मनाचे शेतकरी, राजकारणी मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील गुज्जनवार राजोली ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांची गृहिणी सौ.सविता सुनील गुज्जनवार ह्या देखील विद्यमान ग्राम पंचायत सदस्य यांची कन्या खुशबू चा आज शुभविवाह.
९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी नागपूर येथे होत असून मुलीच्या लग्न कार्य निमित्याने राजोली येथील गरजू व गरीब अपंग महिला नागरिकांना सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे ब्लँकेटचे वाटप चि.सौ. कां.खुशबू हिच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वडील सुनील गुज्जनवार, आई सौ. सविता गुज्जनवार, त्यांचे कुटुंबातील मंडळी उपस्थित होते. मुलीच्या लग्नकार्य प्रसंगी गरजूं अपंग महिलांना ब्लँकेट वाटप केल्याने या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.