News34 chandrapur
चंद्रपूर : इंदिरा गांधी गार्डन शाळेचा वार्षिक महोत्सव येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय वार्षिकोत्सव 'एसेन्स ऑफ टुगेदरनेस' मधे शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमधुर संगीत, मधुर गाणी, उत्कृष्ट नृत्य सादरीकरण आणि मंत्रमुग्ध करणारी नाटकांचे सादरीकरण केला.
प्रमुख पाहुणे, अल्ट्राटेक सिमेंटचे युनिट हेड पी.एस.श्रीराम, कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल पुगलिया व इतर पाहुण्यांनी पारंपरिक दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन केले. मुख्याध्यापिका बावनी जयकुमार यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशाबद्दल व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड, पी.एस.श्रीराम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात आवश्यक असलेले गुण, चांगल्या चारित्र्याची गरज, ध्येयाप्रती बांधिलकी आणि संवाद कौशल्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे आणि त्यांचे करिअर घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील लहान मुलांचे नृत्य सादरीकरण पहिल्या दिवसाचं कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले संगीतमय ऑर्केस्ट्राला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान, पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना क्रीडा, संगीत, कला आणि हस्तकला, विज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेतील विविध कामगिरीसाठी बक्षीस देण्यात आले.
Indira gandhi garden school chandrapur
महोत्सवाच्या दुस-या दिवशी विविध नृत्य सादरीकरण आणि जबर हास्य नाटिका हे कार्यक्रमाचे आकर्षणाचे केंद्र होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एसीसी सिमेंटचे मुख्य प्लांट मॅनेजर के रवींद्रनाथ रेड्डी हे प्रमुख पाहुणे होते. हास्य नाटिका - अकबर: नेव्हर बिफोर आणि हॉरर डान्स हे दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दोन्ही दिवशी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. पहिल्या दिवशी शाळेची हेड गर्ल निधी तुम्मालवार व दुसऱ्या दिवशी हेड बॉय आदित्य शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रशासक जयकुमार सर, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.