News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खानाखुणा चंद्रपुरात सापडतात. मोर्य,सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य,नाग, परमार, गोंड,भोसले याची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत.
आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे शिल्प सापडले आहे. सापडलेले शिल्प चालुक्य काळातील असून बाराव्या शतकातील आहे. खेड मक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीच दुग्धभिषक केलं.यावेळी प्रमोद मानकर,सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम ,गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे,योगेश तुमडे,संदीप गुर्पुडे,केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
Lord krishna idol found in chandrapur
असे आहे शिल्प..
सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्पा काळ्या दगडावर कोरलेल आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेल आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो. अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी दिली आहे. Historical chandrapur