News34 chandrapur
नांदेड/chandrapur - नांदेड पोलीस दलातील कर्मचारी वर्षा ला विजय व्हायचं त्यासाठी तिला शस्त्रक्रिया करायची आहे मात्र त्याचा खर्च राज्य सरकारने उचलावा यासाठी तिला महिन्याभराची रजा हवी आहे, अशी मागणी वर्षा ने केली आहे.
वर्षा ने याबाबत हायकोर्टात दाद मागितली होती मात्र कोर्टाने वर्षा ला मॅट मध्ये जाण्याची सूचना केली. Gender change
पोलीस दलात असणाऱ्या वर्षाच्या वडिलांचे निधन झाले होते, वर्ष 2005 मध्ये वर्षा पवार या पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर लागल्या होत्या, मे 2012 मध्ये त्यांची पोलीस नाईक म्हणून बढती झाली, मात्र वर्षाच्या मनात पुरुष असल्याची भावना वारंवार येत होती. Nanded police
डिसेंम्बर 2018 मध्ये केलेल्या चाचणीत वर्षा पुरुष असल्याचे निष्पन्न झाले, सेंट जॉर्ज हॉस्पिटलने सुद्धा ते रिपोर्ट बरोबर असल्याचे सांगितले होते.
तसेच लिंग बदल करण्याचा सल्ला वर्षा ला देण्यात आला होता. Bombay high court
एप्रिल 2021 मध्ये वर्षा मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे दिल्ली हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले होते. लिंग बदल सल्ल्याबद्दल वर्षा ने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्या मागणीची दखल घेतली नाही.
वर्ष 2022 मध्ये पोलीस अधीक्षक सहित पोलीस महासंचालकाना त्या मागणीचे पत्र देण्यात आले होते, मात्र पोलीस महासंचालकांनी ती मागणी फेटाळून लावली.
पोलीस अधिकाऱ्याकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षा ने हायकोर्टाचे दार ठोठावले, वकील एजाज नक्वी यांनी याचिका दाखल केली, इच्छे नुसार जीवन जगण्याचा सर्वांचा अधिकार व नैसर्गिक गरज असल्याचे त्या याचिकेत म्हटले आहे.
तसेच लिंग बदल शस्त्रक्रिया पार पडल्यावर आपले नाव विजय पवार करण्यात यावे अशी विनंती त्या याचिकतेमार्फत करण्यात आली.
1 फेब्रुवारीला त्या याचिकेवर सुनावणी झाली असता राज्य सरकारच्या वकील ज्योती चव्हाण यांनी आक्षेप घेत पवार यांनी आधी मॅट कडे दाद मागावी असे कोर्टाला सांगितले. Gender change operation
सदर याचीका हायकोर्टाने निकाली काढत पवार यांना मॅट कडे दाद मागावी असे सूचित केले.