News34 chandrapur
चंद्रपूर - राजुरा तालुक्यातील चार्ली येथे गेल्या 10 वर्षांपासून अवैध दारू विक्री स्थानिक पोलिसांचे आशीर्वादाने धडाक्यात सुरू आहे.
गावातील महिलांनी अनेकवेळा याबाबत आवाज उठवला परंतु स्थानिक पोलिसांशी मिलीभगत असल्याने आजवर हा प्रकार सुरूच आहे. Illegal sale of liquor
गावात 24 तास दारू उपलब्ध असल्याने शेतकरी, शेतीवर राबणारा मजूर, युवक आणि कोवळ्या वयाची बालके व्यसनाचे आहारी जात आहे. गावात भांडणं वाढली असून कौटुंबिक कलह देखील वाढले आहेत. Chandrapur police
गावातली शांतता धोक्यात आली असून महिला वर्ग चिंतेत आहे. कुणाचा पती, कुणाचा मुलगा,कुणाचे वडील दारुचे सेवनामुळे कुटुंबाचे नुकसान करत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे कडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. चार्ली च नव्हे या भागातील अनेक गावांत अवैध दारू विक्रीने महिला त्रस्त आहेत. या दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यवाहीचे आवाहन त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक यांचेशी संवाद साधताना केले. तसेच ग्रामपंचायतीने याविरोधात घेतलेला ठराव व सह्यांचे निवेदन सुपूर्द केले.याप्रसंगी उमाकांत धांडे यांनी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी यांची या महिलांशी भेट घडवून आणली. Sp chandrapur
याप्रसंगी सरपंच सुरेंद्र आवारी, संबा माहुरे, माजी सरपंच गंगाधर कुचनकर, किशोर ढूमने, विजय निवलकर, अनिल तुरानकर,कल्पना माहुरे, इंदिरा शेंडे, शकुंतला महाकुलकर,मंगला सोनटक्के,लता तुमाने,मनीषा घाटे यांचेसह गावातील महिलांनी उपस्थिती होती.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.