News34 chandrapur
चंद्रपूर: दिनांक 27 फेब्रुवारी 2023 ला दहावी सीबीएससी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली. हजारो विद्यार्थी परीक्षा देत असून विद्यार्थ्यांचा प्रथम पेपर इंग्रजी विषयाचा होता. सदर पेपर ११ वाजता सुरू झाला. CBSE board exam 2023
विद्यार्थी पेपर सोडवित असताना, सेक्शन सी लिटरेचर मध्ये दिलेल्या Textual passage (From The Diary of Anne Frank) मध्ये Who was Mr.Kessing? मिस्टर केसिंग कोण होते ? असा प्रश्न विचारण्यात आला.सदर प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिलेले होते. परंतु दिलेले चारही पर्याय चुकीचे होते. मिस्टर केसिंग हे गणित (Maths) विषयचे शिक्षक होते परंतु दिलेल्या passage मध्ये तसेच पर्यायात उत्तर नसल्याने विद्यार्थी गोंधळले. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले, काहींनी प्रश्न स्किप केला,तर काहींनी ऑप्शनच्या पलीकडे जाऊन उत्तरे लिहली. सदर प्रश्नाचा पर्याय चुकीचा असल्याने, विद्यार्थी गोंधळात पडले, विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला. CBSE EXAM 2023

सीबीएससी परीक्षा मंडळाने अशी चुक करणे अपेक्षित नव्हते, कारण तज्ञ शिक्षक पेपर काढतात. त्यामुळे आता सीबीएससी बोर्डने चुक मान्य करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी सदर प्रश्न सोडवला असेल किंवा नसेल तरी त्यांना सरसकट गुण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघ अध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर निमेश मानकर यांनी केली.