News34 chandrapur
चंद्रपूर - 31 जानेवारीला एका महिलेने पत्रकार परिषद घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय पावडे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते, संजय पावडे हे बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढण्याची धमकी देत, मंढरे यांच्यामार्फत त्या महिलांना शरीर सुखाची मागणी करतात, इतकेच नव्हे तर पावडे हे रोज कार्यालयात दारूची पार्टी करतात. Molestation
त्या महिलेच्या आरोप प्रकरणात मोठं वळणात्मक बाब पुढे आली आहे, महिलेने आरोप केला की नोव्हेम्बर महिन्यात पावडे यांनी त्या महिलेसोबत अश्लील वर्तन केले, मात्र त्यानंतर त्यांनी माफी मागितली, त्यानंतर पुन्हा 5 जानेवारीला तसाच प्रकार पावडे यांनी केला, याबाबत महिलेने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पावडे यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. Chandrapur breaking news
5 जानेवारीला नेमकं काय झालं? याबाबत माहिती घेतली असता नवी बाब पुढे आली आहे.
संजय पावडे हे मागील 10 वर्षांपासून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव या पदावर कार्यरत आहे, कार्यालयात वेळोवेळी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे असे विविध कामे ते बघत असतात.
ज्या महिलेने पावडे यांच्यावर आरोप लावला आहे त्या महिलेला 4 महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीवर बाजार समितीमध्ये मजूर म्हणून कामाला ठेवले होते, त्या महिलेला कायमची नोकरी म्हणून ठेवण्यात आले नाही, व कायदेशीर व नियमानुसार त्या महिलेची त्या पदावर नेमणूक नाही, समितीला जितकी गरज आहे त्यापुरतेच त्या महिलेला काम देण्यात आले होते.
ज्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात महिलेला काम दिले होते ते काम संपले होते, त्याकरिता तिचे काम संपले असून तिला कामावर ठेवणे शक्य नसल्याने कार्यालयामार्फत तिला तसे कळविण्यात आले होते.
मात्र त्या महिलेने 7 जानेवारीला काही व्यक्तींना सोबत घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घातला, कार्यालयात पावडे यांना शिवीगाळी केली, जर मला कामावरून काढले तर त्याचे वाईट व गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्या महिलेने पावडे यांना दिली होती.
त्यासोबत पावडे यांच्या विरुद्ध चारित्र्य विरुद्ध लांच्छन लावत त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी त्या महिलेने पावडे यांना दिली होती.
ह्या प्रकारानंतर संजय पावडे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
17 जानेवारीला त्या महिलेविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांमधून आता कोण खरं बोलत आहे याचा खुलासा पोलीस तपासातून होणारचं.