News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर कृषी बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी महिलेने समिती सचिव संजय पावडे यांच्यावर गंभीर आरोप लावले असून पावडे विरोधात विनयभंगाची तक्रार त्या महिलेने दिली आहे. molestation
दरवर्षी नव्या महिलांना कृषी बाजार समितीमध्ये कंत्राटी पद्धतीवर नेमत पावडे त्यांना धमकविण्याचे काम करतात तर दुसरीकडे पावडे यांच्या मार्फत मंढरे हे महिलांना आमिष देत साहेब जे म्हणतात ते करावेच लागेल असे वारंवार महिलांवर दबाव टाकतात. Physical demand
याबाबत खुद्द पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत कृषी बाजार समितीमध्ये नेमकं काय चालत? याचा खुलासा केला आहे. Chandrapur Agricultural Produce Market Committee
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सफाई कामगार म्हणून महिला काम करतात मात्र त्यांच्या परिस्थितीचा पावडे हे फायदा घेत असतात, कार्यालयात रोज पावडे हे दारूच्या पार्ट्या करतात असा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत लावला आहे.
नोव्हेम्बर महिन्यात रविवारच्या दिवशी पीडित महिलेला बालाजी मंढरे यांनी कार्यालयात बोलाविले असता महिलेने नकार दिला मात्र कार्यालयाची सफाई करायची आहे असे म्हणत त्या महिलेला मंढरे यांनी कार्यालयात बोलाविले.
त्यावेळी संजय पावडे सुद्धा कार्यालयात हजर होते, मंढरे यांनी महिलेला सफाई करण्यासाठी कापड आणायला सांगितले असता त्या खाली गेल्या, कपाटाच्या मागील भागात कापड घेत असताना पावडे यांनी संधीचा फायदा घेत त्या महिलेसोबत अश्लील वर्तन केले, अचानक झालेल्या या प्रकाराचा महिलेने संताप व्यक्त करीत आरडाओरडा केला.
आता प्रकरण अंगावर येणार असे समजल्यावर पावडे यांनी त्या महिलेची माफी मागितली, पुन्हा असा प्रकार होणार नाही अशी हमी त्या महिलेला दिली.
मात्र 5 जानेवारीला पुन्हा तसाच प्रकार पावडे यांनी केल्याने महिलेने याबाबत रामनगर पोलीस स्टेशन गाठत पावडे व मंढरे विरोधात तक्रार दिली.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिव पावडे हे बाजार समिती मध्ये काम करणाऱ्या महिलांना धमकावितात व त्यांना कामावरून काढण्याची धमकी देतात, मात्र पावडे हे मंढरे यांच्या मार्फत महिलांकडे शरीरसुखाची मागणी करतात असा धक्कादायक आरोप महिलेने पावडे यांच्यावर लावला आहे.
संजय पावडे व बालाजी मंढरे यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असला तरी ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.
प्रशासनाने दोन्ही आरोपीवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.