News34 chandrapur
चंद्रपूर - पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत शहरातील १९५० नोंदणीकृत फेरीवाल्यांना परिचय बोर्ड देण्याचा उपक्रम महानगरपालिकेतर्फे राबविल्या जात आहे. या उपक्रमाची सुरवात मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत मा.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ६ पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेले पत्र देऊन करण्यात आली.
Prime Minister Self-Fund Scheme
यात ज्या पथविक्रेत्यांनाही पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना परिचय बोर्ड मनपाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागातर्फे देण्यात येत असुन वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. Chandrapur municipality
योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे.
प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत २८८४ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ४९५ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला,६ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असुन इतर १०१० लाभार्थी २० हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहेत. Chandrapur Street vendors
शहरातील पथविक्रेत्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केद्र /नागरी सुविधा केंद्र) व ग्राहक सेवा केंद्र येथे ऑनलाईन अर्ज करावेत किंवा महानगरपालिकेच्या नागरी उपजीविका केंद्राकडे ( जुबली हायस्कूल समोर ) अर्ज करता येईल.