News34 chandrapur
अमरावती/चंद्रपूर - अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या आदर्श हायस्कुलची शिर्डी ला सहल निघाली होती, या सहलीत जवळपास 230 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शाळेने नेवासा येथे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली होती.
सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जेवण केले असता त्याठिकाणी त्यांची प्रकृती बिघडली, जेवण केल्याच्या काही वेळाने विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ चा त्रास सुरू झाला. Breaking news
शाळा व्यवस्थापकाने तात्काळ रात्रीच विद्यार्थ्यांना शिर्डी मधील रुग्णालयात दाखल केले, सध्या दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
जवळपास 88 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले, सध्या शिर्डी मधील साईनाथ रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.