News34 chandrapur
चंद्रपूर / यवतमाळ:- ग्रामीण क्षेत्रात विकासाचा दुवा म्हणुन ग्राम रोजगार सेवकांकडे बघितले जाते. ग्रामसेवकाचे मदतनीस म्हणुन या घटकांची सेवा उपयुक्त मानली गेली असल्याने त्यांच्या न्यायोचित मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करुन न्याय मिळवून देवु असे आश्वासन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना जिल्हा चंद्रपूर च्या शिष्टमंडळाला दिले.
Maharashtra State Gram Rojgar Sevak Sangathan
Maharashtra State Gram Rojgar Sevak Sangathan
दि. 14 फेब्रुवारी, 2023 रोजी हंसराज अहीर यांची निवासस्थानी भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले. त्यावेळी अहीर यांनी या रोजगार सेवकांच्या न्यायपुर्ण मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे विनंती करु असेही अहीर यांनी या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. Hansraj ahir
ग्रामीण रोजगार सेवक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या बहुतांश कामावर देखरेख ठेवत असतात. काही महीने वगळता वर्षभरच रोहयो व अन्य योजने अंतर्गत हे रोजगार सेवक विविध विकास कामावर राबणाऱ्या मजुरावर देखरेख, हिशेब व आवश्यक त्या कामाचे विवरण ठेवत असल्याने त्यांना हंगामी रोजगार सेवक न मानता पुर्णकालीन मानण्यात यावे ही मागणी रास्त असल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासनाने पुनर्विचार करावा. शासन निर्देशानुसार त्यांच्या खात्यावर थेट मानघन राशि जमा करण्यात यावी व अन्य न्यायोचित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भुमिका घेवून त्यांना न्याय द्यावा या आशयाचे पत्रसुध्दा हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. सदर प्रश्न हा संपुर्ण महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांशी संबंधीत असल्याने शासनाने या ग्रामीण क्षेत्रात कार्य करणाऱ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही अहीर यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.