News34 chandrapur
चंद्रपूर - संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्ष 1956 ला ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखों नागरिकांना धम्म दीक्षा दिली होती.
67 वर्षानंतर चंद्रपुरात पुन्हा धम्म दीक्षेचा ऐतिहासिक प्रसंग पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमीवर संपन्न होणार आहे, यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचं आगमन होणार आहे.
रविवार 19 फेब्रुवारीला चंद्रपुरातील दिक्षाभूमी वर बौद्ध धम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर आयोजित कार्यक्रमाआधी 10 फेब्रुवारी पासून दीक्षाभूमीवर श्रामनेर शिबिराची सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमात एकूण 36 श्रामनेरांनी दीक्षा घेतली आहे.
या शिबिरात मुंबई येथील भन्ते सुमेधबोधी ज्ञानोबा कांबळे यांचं मार्गदर्शन लाभले आहे.
श्रामनेर शिबीर 19 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्यासोबत दोन दिवसीय समता सैनिक दलाचे शिबीर आयोजित करण्यात आले.
भव्य बौद्ध धम्म परिषद व धम्मदीक्षा सोहळ्यात डॉ.भीमराव आंबेडकर, अरुण घोटेकर, हरीश रावलिया, चंद्रबोधी पाटील, कॅप्टन प्रवीण निखाडे, शंकरराव ढेंगरे, अशोक घोटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत संदीप सोनोने, संकेत जयकर, प्रफुल्ल भगत, सपना कुंभारे, सुजाता लाटकर, कृष्णा पेरकावार, भीमलाल साव, भाऊराव दुर्योधन आदींनी दिली.