News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल : नगरपरिषद मूल स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपरिषद मूल तर्फे भिंती चित्र स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. निशुल्क प्रवेश असून स्पर्धेची नोंदणी नगरपरिषद मूल येथे दिनांक 27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत करायची होती.
भिंतीचित्र स्पर्धेचे विषय स्वच्छ सर्वेक्षण 2023, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, माझी वसुंधरा अंतर्गत येणारी संकल्प चित्र, प्लास्टिक मूल शहर, सांस्कृतिक कला चित्र असे विषय आहेत.
My Vasundhara campaign
या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार 9001 रुपये, द्वितीय पुरस्कार 7001 रुपये, तृतीय पुरस्कार 5001 रुपये आणि पाच प्रोत्साहन पर पुरस्कार 1001 रुपये प्रमाणे ठेवण्यात आले आहे.
Mul municipal council
ही स्पर्धा 9 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ला होणार आहे. स्पर्धेचा निकाल 14 फेब्रुवारीला लागणार आहे. स्पर्धेचे ठिकाण नगरपरिषद तर्फे नेमून दिलेल्या भिंती राहणार आहेत. करीता या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. तसेच स्पर्धेबाबत अधिक माहिती करिता नगर परिषद मुल कार्यालय आरोग्य विभागशी संपर्क साधावा असे आव्हान मुल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले आहे.